पाटीवरची पेन्सील
पाटिवरची पेन्सील
वय वर्षे ६ गव्हाळ रंग ,काजळ घातलेले टपोरे डोळे,आंगा पिंगा ने ही बाळसेदार अशी शुभदा .पण घरचे तिला सर्वे शुभा च म्हणायचे.खुप लाडाकोडात वाढलेली,त्यामुळे थोडी हट्टी आणि एकुलती एक असल्यामुळें सर्वांचे प्रेम शुभा ला मिळत होते.
उद्या तिच्या शाळेचा पहीला दिवस ,शाळेत नाव घातलें होते त्या दिवसा पासून इतका दंगा घातला होता की आईच्या नाकी नऊ आले होते.दिवसभर ति आईच्या मागे नाना प्रश्न विचारत रहायची आई शाळा कशी असते?मला कसं समजणार कुठे जाऊन बसायचं? तिकडच्या बाई तर मला ओळखत पण नाहीत.मग मी हरवले तर?मला कोणी उचलुन नेलं तर तु काय करणार आई?मग तुला दुसरी मुलगी कोण देणार??असं बोलताना छोट्या शुभाचे डोळे पाण्याने भरले होते. आईने लगेचच शुभाला तिच्या जवळ ओढलं आणी तिचे डोळे पुसत म्हणाली ,आई आहे ना बाळा सोबत तुझ्या ,शाळेत न्यायला शाळेतुन आणायला. आणि शाळेतल्या बाई आणि गुरुजी पन असतात सगळया मुलांची काळजी घ्यायला.
पन तु त्यांना सांगितलस ना शुभाला ओरडायचं नाही म्हणुन।। अगं नाही गं बाळा ओरडणार तुला, पन तु पन शहाण्या बाळासारख वागायचसं,कुनाच्या खोड्या नाही काढायच्या हं.आईने प्रेमाने समजाउन सांगितलं.
शुभाच्या चेहर्यावर गोड हसु आलं तशी आई पण गालात खुदकन हसली.आणि म्हणाली वेडं गं माझं कोकरु असं म्हणत तिने तिचे हात शुभा वरुन फिरवत आपल्या डोक्यावर मोडले,कडकड करत सगळी बोटं मोडली.
अगं शुभा शाळेचे कपडे घालुन बघ ना एकदा बघु तरी नव्या कपड्यात कसं दिसतंय पिल्लु माझं
असं म्हणताच छोट्या शुभाने लगबगीने कपाटातुन शाळेचा गणवेश काढला आणि घालु लागली,आई म्हणाली अगं थांब बाळा मी घालते तुला पण ऐकेल ती शुभा कसली.
अगं आई मी शाळेत जाणार आहे ना ऊद्यापासुन आता मी मोठी झाली आहे, माझ काम मीच करणार आत्ता ,असं म्हणत शुभा प्रयत्न तर करु लागली पन शर्टाची बटनं काही तिला लागेनात,हिरमुसला चेहरा करुन आईला म्हाणाली आई नाही येत मला तुच लाव आत्ता,आईने शुभाला गणवेश घातला अगदी बरोबर येत होता हे पाहुन आई पन सुखावली.
आई मी कशी दिसतें? शुभा चा लडिवाळ प्रश्न ऐकुन आई म्हणाली खुप खुप छान अगदी दृष्ट लागण्यासारखी,असं म्हणत आईने काजळाचा तीट शुभाला लावला.
आत्ता नाही नजर लागायची आईची पण.
शुभा खुष झाली आणि म्हणाली आई मी माझ्या मैत्रीणींना नवा शाळेचा डे्स दाखवुन येऊ का?आई नेही मान हलवुन संमती दिली.
थोड्या वेळाने शुभा आली बरेचसे चौकलेट घेऊन ,आई मी नाही मागीतलं कोनाला मी नको नको म्हणताना पण दिलं मला.असं म्हणताना शुभाचा चेहरा रडवेला झाला होता,अगं हो बाळा नाही रागवत मी पण सर्व नाही खायचं आत्ता हं शुभाने पण डोळ्यांनी हसत हो म्हटलं आणी आई ला मिठी मारली.
आत्ता काढुन ठेव हं ऊद्या शाळेत जाताना घालायचा आहे ना।।
शुभाने ही हो म्हटलं , चला झोपा आत्ता ऊद्या शाळेत जायचेस ना?
अगं आई आत्ता बाबांना दाखवायला पुन्हां शाळेचे कपडे घालायला लागतिल ना??
आई खुदकन हसली आणी म्हणाली नाही बाबांना यायला उशिर होईल तोवर तु झोपशील पण .बाबांना सांगेन हो मी,झोप आत्ता.
शुभाने डोळे बंद केले खरे पण तिला झोप काही येईना,तिची शाळा आणी तीच तिला डोळ्यासमोर दिसु लागले होते.
सकाळ झाली आणी शुभाचे डोळे उघडले,अरे व्वा आज न उठवताच ऊठलं का माझं बाळ?शाळेत जायचय ना आज विसरलेच की मी आई हसुन बोलली.
आई मला आंघोळ घाळ न लवकर शाळेला ऊशीर होईल मग,नाही गं बाळा नाही होणार ऊशीर आई आहे ना.
शाळेचा पहिला दिवस होता शुभा खुप खुष होती आज.
नवा गणवेश नवीन शाळेचे दप्तर नवीन पाण्याची बाटली नवीन सँडल नवीन रीबीनी सर्व कसं नवं नवं होतं.
आईने छान काजळ पावडर लावत शुभाला तय्यार केलं आणी दोघ्या माय लेकी शाळेत निघाल्या ,आईचा हात घट्ट धरत कधी आईचा पदर ओढत शुभा शाळेला निघाली होती.
आई शुभाला म्हणाली बाळा शाळेत निट वागायचं हं शहाण्या मुलांसारख ,आई दुपारी डबा घेऊन येईन हं .शुभाने मान हलवुन हो म्हटल.
शाळा अगदी समोर दिसत होती तशी शुभाची चलबिचल सुरु झाली,आई ने जवळ घेतल आणि गालावर एक चुंबन दिलं.आत्ता माझा या गालावरचा पावडर गेला बघ,म्हणुन शुभा नाराज झाली, आईने लगेचच तिच्या पदराने शुभाचा गाल पुसुन काढला.तेवढ्यात कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला,आईने वळुन पाहील तर एक छोटीशी मुलगी होती,शुभा सारखीच शुभाच जणु.
शाळेचा गणवेश दोन वेण्या लाल रिबीनी लावलेल्या ,गळयात पाण्याची बाटली पण ती केवीलवाणी रडत होती, टपोरे अश्रुचे थेंब गालांवरुन निसटुन जात होते.
आईने तिला विचारलं काय गं बाळा काय झालं?का रडतेस ?शुभाने लागलीच आईच्या पदराला हिसका दिला आणी रागाने बघत हळुच म्हणाली आई तु तिला बाळा का बोलतेस ?आई म्हणाली। तुझ्यासारखीच आहे नं म्हणुन.
बरं काय नाव आहे तुझं?आणी का रडतेस तु?एकटीच आलीस का शाळेत?आई कुठाय तुझी??
मी मी ...माझी पेन्सिली हरवलीये आत्ता मला खुप मार मिळेल..कशी बशी रडक्या सुरात ति बोलु लागली.
शुभा म्हणाली मग काय झालं सांग ना आईला पाटीवरची पेन्सील हरवली म्हणुन, मी पण सांगते आईला माझ्याकडुन काही हरवलं तर।।
मी नाही सांगु शकत ती माझी खरी आई नाहीये सावत्र आई आहे ती माझी,आत्ता मी काय करु असं म्हणत ती पुन्हा हुंदके देत रडु लागली.
शुभा बाळा एक पेन्सिल दे पाहु हिला मी तुला बाबांना सांगुन दोन नव्या पेन्सील देईल ,
असं म्हणत आईने तिला जवळ घेतलं आणि डोक्यावरुन हात फिरवत म्हणाली आत्ता नाही ओरडणार आई तुला.
शुभाने आई कडे रागाने पाहीलं असा लाड आई फक्त शुभाचाच करत होती ,आज शुभाला आईचा खुप राग आला होता ,तेवढ्यात कुठुन तरी दोन थेंब पाणी शुभाच्या हातावर पडलं ,शुभाने वर मान करुन पाहीलं तेव्हा ते पाणी आईच्या डोळ्यांतुन येत होते.
आई ला रडताना शुभाने पहिल्यांदाच पाहीलं होतं.
आई तु नको रडुस ना मी देते तिल एक पेन्सिल असं म्हणत शुभाने एक छोटो पेन्सील तीला दिली.
खुष झाली ती मुलगी ,हसरा चेहरा करत ती शाळेकडे वळली,शुभाने आई कडे बघुन हात वर केला आणी तीही शाळेत गेली.
शुभाने दोनदा वळुन पाहीलं आई तिथेच उभी होती,आणी पदराने डोळे पुसत होती.
शुभा ला बाईंनी वर्ग दाखवला आणी त्यांच्या समोरच बाकावर बसवलं,खुप मोठा वर्ग होता आणी बाई पण छान होत्या आई सारखीच त्यांनी साडी नेसलेली होती, पण हे काय मघाशी रडणारी मुलगी माझ्या बाजुला बसली होती.
तिने गोड हसुन माझं नाव मीरा आणी तुझं?
शुभदा पण मला सगळे शुभा म्हणतात.
बाईंनी काही शिकवलं नाही,पहीलाच दिवस होता ना ,पण शुभाला खुप मज्जा आली होती,घरी येऊन तिने आई बाबांना शाळेच्या गोष्ठी सा़गु लागली,शाळेत केलेली मज्जा आणि नविन बाई नीं सांगितलें ली गोष्ट सर्व काही नव होतं.आई बाबा ही शुभाला खुष पाहुन आनंदित होते .
ठरल्या प्रमाने आई कडुन पेन्सील घ्यायला शुभा विसरली नाही मात्र .
दुसर्या दिवशी पुन्हा शुभाला शाळेत जायची घाई होती, भरभर तयारी करुन आई आणी शुभा पुन्हा शाळेत जायला निघाल्या, शाळा आली तशी शुभा आईला आत्ता तु जा आई नाहीतर ती मुलगी पुन्हा येईल ,आणी तु रडशील परत ,तु जा आई ,असं म्हणत शुभा शाळेत गेली.
मीरा शुभाला पाहुन गोड हसली.पण आज तुला मी माझी पेन्सील देणार नाही हे शुभाने मनात ठरवलं होतं.
मीराने दप्तरातुन एक नविन पाटीवरची पेन्सील काढुन शुभाला दिली.आणी म्हणाली काल बाबांना मी कानात सांगितलं ते्वहा बाबांनी गुपचुप आणुन दिली मला .
हि घे तुझी पेन्सील.....
शुभाकडे आत्ता तीन नव्या पेन्सीली होत्या,खुष झाली होती स्वारी आज...
घरी आल्या आल्याच तिने आईला सांगितलं आई त्या मुलीने मला नविन पेन्सील दिली म्हणुन.
पण आई सावत्र काय असतं गं ?आईने शुभाला जवळ घेतलं आणि म्हणाली अजुन लहान आहेस बाळा पण एक सांगते कुणाला कधी मदत हवी असेल तर नक्की करत जा.
आईचे ते शब्द शुभाच्या नेहमी लक्षात राहीले.
पाटीवरच्या पेन्सीलीने शुभा आणी मीराच्या शाळेचा शुभारंभ झाला होता..
संगिता
Comments
Post a Comment