पाटीवरची पेन्सील
पाटिवरची पेन्सील वय वर्षे ६ गव्हाळ रंग ,काजळ घातलेले टपोरे डोळे,आंगा पिंगा ने ही बाळसेदार अशी शुभदा .पण घरचे तिला सर्वे शुभा च म्हणायचे.खुप लाडाकोडात वाढलेली,त्यामुळे थोडी हट्टी आणि एकुलती एक असल्यामुळें सर्वांचे प्रेम शुभा ला मिळत होते. उद्या तिच्या शाळेचा पहीला दिवस ,शाळेत नाव घातलें होते त्या दिवसा पासून इतका दंगा घातला होता की आईच्या नाकी नऊ आले होते.दिवसभर ति आईच्या मागे नाना प्रश्न विचारत रहायची आई शाळा कशी असते?मला कसं समजणार कुठे जाऊन बसायचं? तिकडच्या बाई तर मला ओळखत पण नाहीत.मग मी हरवले तर?मला कोणी उचलुन नेलं तर तु काय करणार आई?मग तुला दुसरी मुलगी कोण देणार??असं बोलताना छोट्या शुभाचे डोळे पाण्याने भरले होते. आईने लगेचच शुभाला तिच्या जवळ ओढलं आणी तिचे डोळे पुसत म्हणाली ,आई आहे ना बाळा सोबत तुझ्या ,शाळेत न्यायला शाळेतुन आणायला. आणि शाळेतल्या बाई आणि गुरुजी पन असतात सगळया मुलांची काळजी घ्यायला. पन तु त्यांना सांगितलस ना शुभाला ओरडायचं नाही म्हणुन।। अगं नाही गं बाळा ओरडणार तुला, पन तु पन शहाण्या बाळासारख वागायचसं,कुनाच्या खोड्या नाही काढायच्या हं.आईने प्रेमाने समजाउन सांगितलं...